Pimpri news: स्थानिक विरोधकांच्या टीकेला उत्तर देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप

मी एका ठिकाणी कामात आहे. माझी बाजू नंतर कळवतो, असे म्हणत यावर भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे अधिक भाष्य करण्याचे टाळले.

एमपीसी न्यूज – शरद पवारसाहेब, अजित पवार काही बोलले असते, तर मी बोललो असतो. गल्लीत कुठे बोलणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे बोलत नाहीत. तुम्ही कुठे मला इथे अडकून ठेवता, असे म्हणत स्थानिक विरोधकांच्या टीकेला उत्तर देणार नसल्याचे भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सत्ताधारी भाजप, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यावर हल्लाबोल केला होता. भाजपने साडेतीन वर्षात शहरात काहीच विकासकामे केली नाहीत.

जनतेच्या हिताची केवळ दहा टक्के तर स्वहिताची 90 टक्के कामे केली आहेत. भाजपच्या दोन आमदारांनी शहरासाठी काहीच केले नसून हे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील जनता पाहत आहे, असा आरोप केला होता.

याबाबत विचारले असता आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, शरद पवारसाहेब, अजित पवार काही बोलले असते तर मी बोललो असतो. गल्लीत कुठे बोलणार, असे म्हणत स्थानिक विरोधकांच्या टीकेला उत्तर देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मी एका ठिकाणी कामात आहे. माझी बाजू नंतर कळवतो, असे म्हणत यावर भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे अधिक भाष्य करण्याचे टाळले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.