Pimpri News : भारत विकास परिषदतर्फे हिवाळी आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – भारत विकास परिषद पिंपरी-चिंचवड तर्फे रविवारी (दि.22) शिक्षण ग्राम (अनाथ मुलांसाठी निवारा) देवले- कामशेत येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित (Pimpri News) करण्यात आले. शिबिरामध्ये 95 मुले व मुलींचा सहभाग होता.

 

यावेळी भा वि प पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष अजय बोरवणकर व  किशोर गुजर, कोथरूड शाखेचे प्रदीप ओकपिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष डॉ.रामचंद्र आपटेसचिव वैशाली दुगड आणि संस्थेचे सदस्यतसेच शिक्षणग्राम संचालिका योगिता मून आदी  उपस्थित होते. डॉ.अग्रवाल नेत्र रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञांनी नेत्र तपासणी केली. अॅनिमिया मुक्त भारत योजने अंतर्गतभारत विकास परिषदेच्या पॅथॉलॉजी प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांनी हिमोग्लोबीन रक्त तपासणी केली.

Pune News : संजय चोरडिया यांचा ‘इंडियन अचिव्हर्स अवार्ड’ ने सन्मान

किशोर गुजर यांनी डोळ्यांची स्वच्छता व काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली.अध्यक्ष डॅा रामचंद्र  आपटे यांच्या सुंदर नियोजनातून व सर्व सभासदांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी झाले. संस्थेतर्फे मुले व मुलींना (Pimpri News) पौष्टिक खाऊ तीळवडी, शेंगदाणेगूळ यांचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.