Pimpri News: रुग्णसंख्या पाचशेच्या आत, आज 461 नवीन रुग्ण

529 जणांना डिस्चार्ज, 6 मृत्यू

एमपीसी न्यूज – मागील पंधरा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येला ब्रेक लागला आहे. रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली असून ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

शहराच्या विविध भागातील 440 आणि पालिका हद्दीबाहेरील 21 अशा 461 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 83 हजार 433 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 529 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 5 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 1 अशा 6 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड, नवी सांगवी, पिंपरी, पिंपळेगुरव, तळेगांवदाभाडे येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 83 हजार 433 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 77 हजार 766 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1417 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 546 अशा 1963 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2703 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.