Pimpri News: सफाई कामगार महिलांचे ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – कष्टकरी सफाई कामगार महिलांनी विविध मागण्यांसाठी ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन केले. रस्ते सफाई कचरा प्रक्रिया मधील करोडोंचा मलिदा लाटण्यासाठी चतुर्थश्रेणी कामगारांची भरती केली जात नाही. कष्टकरी सफाई कामगार महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केला.

कष्टकरी कामगार पंचायत वतीने सफाई कामगार महिलांचे विविध प्रश्नांसाठी ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पंचायत कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, अध्यक्ष बळीराम काकडे, जया धोत्रे,स्वाती सोनार, मनीषा जाधव, अनिता मोरे, स्वाती सोडे, प्रभावती सुरते आदी सहभागी झाले होते.

महापालिकेमध्ये रस्ते साफसफाईसाठी सोळाशे महिला कंत्राटी पद्धतीने कामे करत आहेत. गेली वीस वर्षांपासून या महिला रस्ते सफाईचे कामे करतात. एखाद्या ठिकाणी कायम कामे असतील. तर, त्या ठिकाणी ठेकेदार पद्धत बंद करून कंत्राटी कामगारांना कायम केले पाहिजे, असे कामगार कायद्याप्रमाणे नियम असताना देखील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मात्र रस्ते साफसफाई घन कचरा प्रक्रियांमध्ये करोडोंचा मलिदा खाण्यासाठी अधिकारी ठेकेदार संगनमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे गेली वीस वर्षापासून चतुर्थी श्रेणी कामगारांची भरती केली जात नाही. इतर सर्व विभागात भरती सुरू आहे. परंतु, चतुर्थी श्रेणी कामगारांची भरती न केल्यामुळे कष्टकरी सफाई कामगार महिलांवर अन्याय होत असल्याचे कांबळे म्हणाले.

”सर्व सोळाशे महिलांना कायम करा”, ”रस्ते सफाई घण कचरा प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी करा”, ”महापालिका आयुक्त राजेश पाटील होश मे आयो…होश मे आके बात करो…बात तो तुमको करणी होगी”, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.