Pimpri news: कामगारांना आता रॅपिड अँटिजेन चाचणीची मुभा

एमपीसी न्यूज – कामगारांना दर 15 दिवसांला कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक केल्याने खासगी प्रयोगशाळेवर मोठ्या प्रमाणात ताण येत होता. रिपोर्ट येण्यास 78 तास लागत होते. त्यात सुधारणा करत प्रशासनाने कामगारांना आता रॅपिड अँटिजेन चाचणीची परवानगी दिली आहे. त्याचे निगेटिव्ह पत्र सोबत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांना रिपोर्टसाठी थांबावे लागणार नाही. प्रयोगशाळेवरील ताणही कमी होईल.

मिनी लॉकडाऊनमध्ये कामगारांना कामावर जाण्याची परवानगी दिली आहे. परंतू, ज्याचे लसीकरण झाले नाही. त्यांच्याकडे 15 दिवसांसाठी ग्राह्य असलेली आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्हचे प्रमाणात असणे आवश्यक राहील. दर 15 दिवसाला चाचणी करणे बंधनकारक केले आहे. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्हचे प्रमाणपत्र, लसीकरण केलेले नसल्यास एक हजार रुपये दंड वसूल केला जात होता. रॅपिड अँटिजेन चाचणीला मुभा दिली नव्हती.

त्यामुळे कंपन्यांकडून बल्कमध्ये 15 दिवसाला कामगारांची आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. खासगी प्रयोगशाळेकडे नमुने पाठविले जातात. परिणामी , प्रयोगशाळेवर मोठ्या प्रमाणात ताण येत होता.

_MPC_DIR_MPU_II

रिपोर्ट येण्यास तीन-तीन दिवस लागत होते. याची दखल घेत प्रशासनाने आदेशात सुधारणा केली आहे. आता कामगारांना रॅपिड अँटिजेन चाचणीची परवानगी दिली आहे. अँटिजेन चाचणी निगेटिव्ह असल्याचे पत्र सोबत ठेवण्याची मुभा दिली आहे.

याबाबत डॉ. पल्लवी एन.  म्हणाल्या, “कामगारांची 15 दिवसाला चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु, सरकारने वेगळी सोय केली पाहिजे. कामगारांच्या तपासणीसाठीच काही प्रयोगशाळा ठेवल्या पाहिजेत. अथवा 70 टक्के रुग्ण आणि 30 टक्के कामगारांची चाचणी करावी अशा सूचना दिल्या पाहिजेत.

कंपन्यातील कामगारांचे रिपोर्ट थोडे उशिरा दिले तरी मान्य केले पाहिजेत. रिपोर्ट येण्यास 78 तास लागत आहेत. आरटीपीसीआरचा रिपोर्ट 78 तासासाठीच ‘व्हॅलीड’ असतो. 78 तासांनंतर रिपोर्ट यायला लागले तर तपासणीचा काहीच उपयोग होत नाही.

प्रशासनाने आदेशात सुधारणा करून कामगारांना ‘आरटीपीसीआर’, रॅपिड अँटिजेन चाचणीची परवानगी दिली. हा चांगला निर्णय घेतला आहे. आता कामगारांना रिपोर्टसाठी थांबावे लागणार नाही. प्रयोगशाळेवरील ताण कमी होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.