Pimpri News : कोरोना काळात श्रमिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे – डॉ. रत्नाकर महाजन

एमपीसी न्यूज – कोरोना सारख्या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणा-या श्रमिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे. यासाठी समाजातील विविध सामाजिक, संस्था, संघटना तसेच उद्योजकांनी पुढाकार घेतला पाहिजे. या महामारीच्या भीतीने लॉकडाऊन काळात देशभरातील जनतेला घरात बसावे लागले. त्या काळात कुटुंबसंस्थेतील नाते संबंध आणखी सुदृढ झाले. आरोग्य, वैद्यकीय, पोलिस, प्रशासन तसेच पाणी, वीज पुरवठा विभागातील कर्मचा-यांनी केलेले काम नागरिक कधीही विसरणार नाहीत. असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत काम करणा-या कर्मचा-यांचा सत्कार डॉ. महाजन यांच्या हस्ते आकुर्डी येथे शनिवारी करण्यात आला. मंजूषा विनायक अनगळ, मेहबूब लियाकत शेख, संतोष मोहन आठवाल, विनोद भाऊसाहेब बगाडे यांच्या स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक सुरेश लिंगायत आणि हरिदास नायर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, शाम अगरवाल, ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, हरीदास नायर, राजेंद्रसिंह वालिया, ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, परशूराम गुंजाळ, सतिश भोसले, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सुरेश लिंगायत, भाऊसाहेब मुगूटमल, मेहताब इनामदार, मयूर जयस्वाल, गौरव चौधरी, विशाल कसबे, मॅन्युअल डिसूजा, भास्कर नारखेडे, पांडूरंग जगताप, चंद्रशेखर जाधव, विठ्ठल कळसे, हिरामण खवळे, मकरध्वज यादव, अक्षय शहरकर, बाबा बनसोडे, सुनिल राऊत, प्रतिभा कांबळे, आशा शहाणे, रणजित तिवारी, ओंकार चिमीगावे, समाधान सोरटे, लक्ष्मण बोडरे, रवी एनपी, अनिकेत आरकडे, आशा काकडे, मोहिणी पाटील, वैराग भंगाळे आदी उपस्थित होते.

कोरोना काळात मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांना त्यांचे हक्क व विमा सारखे आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, अशीही अपेक्षा डॉ. रत्नाकर महाजन यांनी यावेळी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.