Pimpri News: जागतिक रक्तदाता दिनानिमित्त कै. नंदा ज्ञानदेव भोजने प्रतिष्ठानचा गौरव

एमपीसी न्यूज – जागतिक रक्तदाता दिनानिमित्त वायसीएमएच रक्तपेढीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या गौरव समारंभामध्ये रक्त संकलनाचे कार्य करणाऱ्या कै. नंदा ज्ञानदेव भोजने प्रतिष्ठानचा गौरव करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक भोजने यांनी या सन्मानाचा स्वीकार केला.

कोरोनाने भारतात शिरकाव केल्यापासून महामारीमुळे अनेक रुग्णांना रक्त,प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा या सर्वांची अत्यंत आवश्यकता भासत होती. या आपत्कालीन परिस्थितीची गरज लक्षात घेऊन आणि सामाजिक कार्याची जाणीव ठेवून अनेक संस्थानी निःस्वार्थ भावनेने आपले योगदान दिले. तसेच रक्त संकलनाचे कार्य केले.

वायसीएमएच रक्तपेढीच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील काही मोजक्या संस्था, प्रतिष्ठान रक्तदाता, रक्तदान शिबिर संयोजक व आयोजकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी म्हाडा मोरवाडी येथील कै.नंदा ज्ञानदेव भोजने प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक भोजने यांचा वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेश वाबळे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

भोजने यांच्या आईचा मृत्यू 2015 साली झाला. आईच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे ठरविले. त्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून म्हाडा मोरवाडी परिसरात भोजने परिवार त्याच्या सहकारी मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.