Pimpri news: ‘वायसीएमएच’चे डेडहाऊस 22 दिवसांपासून बंद

शहरात कोरोनाचा कहर सुरू असून, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दररोज सुमारे 20 ते 25 रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच इतर आजारांच्या रुग्णांचा, अपघात झालेल्यांचाही मृत्यू होत आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामधील डेड हाऊस मागील 22 दिवसांपासून बंद आहे. यामुळे मृतांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

शहरात कोरोनाचा कहर सुरू असून, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दररोज सुमारे 20 ते 25 रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच इतर आजारांच्या रुग्णांचा, अपघात झालेल्यांचाही मृत्यू होत आहे.

दूरच्या नातेवाईकांना मृतदेह लगेच नेणे शक्‍य होत नाही. तसेच नॉन कोविड रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे शवविच्छेदन करावे लागते. त्यामुळे मृतदेह शवागृहात ठेवण्याची वेळ येते.

मात्र, शवागृहातील कॉम्पेसर बंद पडले आहे. त्यामुळे गेल्या 22 दिवसांपासून शवागृह बंद आहे. तिथे मृतदेह ठेवण्यासाठी नकार दिला जातो. प्रशासनाने बर्फाच्या लाद्या ठेवल्या आहेत. त्यामध्येही मृतदेह ठेवला जात नाही.

त्यामुळे नातेवाईकांना निम्म्या रात्री अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह न्यावा लागतो. किंवा मृतदेह तसाच ठेवावा लागतो. त्यामुळे नातेवाईकांना त्रासाला सामोरे जावे लागते.

सत्ताधाऱ्यांना याची कल्पनाही नव्हती. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी निवदेन दिल्यावर सत्ताधा-यांना माहिती कळाली. त्यांनतर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला आणि माहिती घेतली.

दरम्यान, डेडहाऊस बंद असून त्यामध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक साहित्य खरेदीसाठी निविदा काढली असल्याचे आयुक्तांनी पक्षनेते नामदेव ढाके यांना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.