Pimpri News: तरुणींनी शहरातील राजकारणात प्रवेश करावा – दुर्गा भोर

एमपीसी न्यूज-  तरुणींनी शहरातील राजकारणात प्रवेश करावा, असे मत दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष दुर्गा भोर यांनी(Pimpri News)  व्यक्त केले. पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी शहराचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर शहरातील तरुणींनी राजकारणामध्ये प्रवेश करून महानगरपालिकेचे प्रश्न सोडविण्यामध्ये लक्ष दिल्यास जागतिक पातळीवर पुन्हा एकदा शहराचे नाव उंचावल्याशिवाय राहणार नाही.

पिंपरी चिंचवड शहरात महिला राज आणून एक वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे सध्या शहराची दयनीय अवस्था पाहता शहरातील समस्या आहे तिथेच असून फक्त शहराला रंगरंगोटी सारखे सजविण्याकडे शासनाचा जास्त  कल दिसून येतो .शहरातील वाढती गुन्हेगारी महिलांवर होणारे अत्याचार बेरोजगार महिला यांचा प्रश्न सोडविण्यासाठी तरुणींनी राजकारणात येणे महत्त्वाचे असून सत्तेमध्ये आल्यास अनेक महिलांचे प्रश्न हे मार्गी लागतील.

Chinchwad By-Election : चिंचवड पोटनिवडणूक सर्व ताकदीनिशी लढण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार – नाना काटे

येणाऱ्या आधुनिकरणाला सामोरे जाण्यासाठी ,शहराचा खऱ्या अर्थाने बदल घडवून रोजगारासारख्या मूलभूत समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी, शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात खऱ्या अर्थाने महानगरपालिकेचे नाव पुढे नेण्यासाठी तरुणींचे सक्षम नेतृत्व असणे गरजेचे आहे. दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे तरुण तरुणींना प्रोत्सानात्मक दिशा देऊन पुढील काळामध्ये तरुण नेतृत्व उभे करण्याची संधी देण्यात येणार असल्याचे दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर यांनी आज प्रसिद्धी पत्राद्वारे(Pimpri News) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.