Pimpri News: युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसची विस्तारित 55 जणांची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. नवीन पदाधिका-यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते नियुक्त पत्रांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, प्रदेश सचिव उमेश पवार, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल उपस्थित होते.

पृथ्वीराज साठे म्हणाले, “आजचा भारत हा युवा देश म्हणून ओळखला जातो. देशातील जवळपास निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या तरूणांची आहे. त्यामुळेच देशाची युवा क्रयशक्तीच देशाला मोठ्या उंचीवर नेऊ शकते. या युवा शक्तीला समाजसेवेचा संस्कार देण्याचे कार्य युवक काँग्रेस करू शकते. अधिकाधिक युवकांना काँग्रेस विचारधारेतून अधिक सक्षम व प्रभावी देशकार्य करण्याची प्रेरणा संघटनात्मक कार्यातून मिळते.

नेतृत्व विकासाला गती देऊन नवनेतृत्व तयार करण्याचे काम युवक काँग्रेस करत असते. आज देशापुढील असलेली आव्हाने व जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी युवकांवर मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी युवक काँग्रेसने अधिकाधिक युवकाचे संघटन करून जनहितासाठी मोर्चे, घेराव व अन्यायाविरोधात लढा उभारावा” असे आवाहन साठे यांनी केले.

 नरेंद्र बनसोडे म्हणाले, “युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसाधारण घरातील युवकांना संघटनेत संधी देण्यात आली आहे. राजकारणाबरोबर युवकांना समाजाभिमुख कार्यांचे चांगले ज्ञान मिळावे, यासाठी प्रशिक्षण शिबिरे व विविध उपक्रमातून सक्षम युवक घडविण्याचे काम आगामी काळात करणार आहोत. महानगरपालिका निवडणूकीत अधिकाधिक युवकांना संधी मिळण्यासाठी रचनात्मक कार्याद्वारे प्रयत्न केले जातील.

नियुक्ती केलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे 

शहर जिल्हा सरचिटणीस : गणेश शितोळे, डॉ. ओमेर खान, निखिल भोईर, राहूल काळभोर, विशाल कसबे, चंद्रशेखर जाधव, मिंलिद बनसोडे, शंकर ढोरे, अपूर्वा इंगवले, रोहन वाघमारे, विशाल सरवदे, स्वप्निल बनसोडे, नियाज खान.

शहर जिल्हा सचिव: तुषार पाटील व वसीम शेख, चिंचवड विधानसभा सरचिटणीस: अमित जगदाळे अविनाश मेश्राम अर्णव कामठे ओंकार पवार मयुर तिखे तेजस पाटील नसीम शेख अश्विन खामकर, अभिषेक रानवडे, श्रेयस गायकवाड, जिफिन जॉनसन, स्नेहल गायकवाड, शैलेश आनंतराव,रोहित शेळके, डेविड श्रीसुंदरन,नीता चामले, सीमा पाटील, स्तुती अडागळे. , भोसरी विधानसभा सरचिटणीस :सईद खान,अजहर शेख,नफिस खान,नदीम कुरेशी,साहिल शेख,शमीम खान, रियाज चौधरी, मूनसफ अख्तर, मयूर रोकडे.

पिंपरी विधानसभा सरचिटणीस: हरी निसर्गंध, अनिल सोनकांबळे, राहुल शिंदे,पांडुरंग वीर, विजय बनायत, विवेक भाट, हर्षवर्धन पाढरकर,फारूक खान,दिपक भंडारी.

या प्रसंगी शहर उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, शहर सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, गौरव चौधरी, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, उपाध्यक्ष सौरभ शिंदे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.