Pimpri News: भाजयुमोतर्फे ‘युवा संवाद’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शहरामध्ये युवा वर्गाशी संवाद साधण्यासाठी “युवा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाची मोशी, चिखलीमधून बुधवारपासून सुरूवात करण्यात आली.

यावेळी युवा नेते निलेश बोराटे, महिला मोर्चा उपाध्यक्ष सोनम जांभुळकर, चिटणीस रवी जांभुळकर, उपाध्यक्ष अतुल बोराटे, चिटणीस साई कोंढारे, चिटणीस प्रकाश चौधरी, चिटणीस मिलींद रोकडे, गणेश बोराटे, अभिनय बोराटे, अनुप बोराटे, सिद्धेश बोराटे, अश्विन राजपूत, पूजा राऊत, नगमा खान, रुक्मिणी डोनगावे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

“युवा संवाद कार्यक्रम हा शहरातील प्रत्येक प्रभागात राबवण्यात येणार असून युवकांना केंद्रस्थानी ठेवुन त्यांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल हाच मुख्य उद्देश असल्याचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी सांगितले.

यावेळी युवकांशी ‘आत्मनिर्भर भारत, रोजगाराच्या संधी व भविष्यातील व्यावसायिक संधी’ यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. तसेच युवकांना कौशल्य विकास, शहरात राबवण्यात येणाऱ्या विविध योजना याबद्दल माहिती देण्यात आली.

शहरातील संपर्क प्रभागात पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, सोशल मीडिया संयोजक विक्रांत गंगावणे, सोशल मीडिया संयोजक युवती पुजा अल्हाट, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश डोंगरे, व्यापारी आघाडीचे संयोजक राजेश राजपुरोहीत व इतर आघाडीचे संयोजक भेटी देऊन युवकांशी संवाद साधणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.