Pimpri News : एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांसाठी वायआरजी केअर आणि मंथन फाउंडेशनचा विशेष उपक्रम

एमपीसी न्यूज – एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांसाठी वायआरजी केअर आणि मंथन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यामध्ये शून्य ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना आरोग्य, आहार, सामाजिक सुरक्षा आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन आणि साहाय्य केले जाते.

नुकताच हा उपक्रम पुणे आणि मंचर येथे घेण्यात आला. मंचर येथील कार्यक्रमात वायआरजी केअरचे जिल्हा समन्वयक दीपक निकम, मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट, डॉ. नीता पद्मावत, रिलीफ फाऊंडेशनचे मनीषा परदेशी, कविता परदेशी, रंजना गावडे तसेच तेजस वाकचौरे, रेखा डाळिंबे, अमर चव्हाण, देविदास मोरे, संगीता मुराद आदी उपस्थित होते. चाकण, मंचर, जुन्नर, नारायणगाव, मावळ अशा विविध ठिकाणहून एचआयव्ही सह जगणारे एकूण 60 पालक व मुले उपस्थित होते. मुलांना शैक्षिणक साहित्य वाटप करून कार्यक्रम करण्यात आला.

एचआयव्ही असलेल्या अनेक रुग्णांची मानसिकता वेगळी असते. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी वायरजी केअर आणि मंथन फाउंडेशन यांच्या माध्यमातून अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ठिकठिकाणी जाऊन तिथल्या एचआयव्हीसह जगणा-या मुलांशी आणि पालकांशी या संस्था संपर्क साधतात. त्यांना एकत्रित करून योग्य मार्गदर्शन केले जाते. मुलांचे वय 18 पेक्षा अधिक झाल्यांनतर त्यांना नोकरीच्या देखील संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

वायआरजी केअरचे जिल्हा समन्वयक दीपक निकम यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अ‍ॅक्सलरेट प्रकल्पांतर्गत मुलांसाठी आरोग्य, शिक्षण, आहार, सामाजिक सुरक्षितता व सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास या पंचसूत्रीवर आधारित शून्य ते 18 वयोगटातील मुलांसाठी मंथन फाउंडेशन व रिलीफ फाउंडेशन या सामजिक संस्थेच्या सहकार्याने एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा, या उद्देशाने काम सुरु आहे. जगातील हा पहिला उपक्रम पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमात विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले. यामधे सर्व मुले उत्साहाने सहभागी झाली. मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी सस्थेच्या विविध उपक्रम तसेच एचआयव्ही संक्रमित व्यक्तींचे हक्क, अधिकार व जबाबदारी याबद्दल माहिती दिली.

मंथन योगाच्या डॉ. नीता पद्मावत यांनी सांगितले की, आपल्याला त्रिसूत्रीचे पालन करा. त्यामधे एआरटी वेळेवर खा. दुसरा आहार, तिसरा योगा करा तर आपण आणखी निरोगी, आनंदी व शांतीपूर्ण आयुष्य जगू शकू.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा परदेशी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.