Pimpri News: महापालिकेचे 15 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून फेब्रुवारी 2021 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 15 अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश सुपूर्द करुन करण्यात आला.

महापालिका भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या सुप्रिया सुरगुडे, अविनाश तिकोने, गोरख भालेकर, गणेश भोसले आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी, प्रशासन अधिकारी रमेश वस्ते, भांडारपाल छाया सांगोळे, वाहनचालक अनिल वडागळे, वीज पर्यवेक्षक मनोज लिमजे, उपशिक्षक जुलेखा शेख, रखवालदार वसंत वावरे, विलास लांडगे, सफाई सेवक अनुसया सोनवणे, कचरा कुली प्रकाश साळवी तर स्वेच्छानिवृत्त होणा-यांमध्ये मुकादम अर्जुन चव्हाण, सफाई सेवक मनोज सोलंकी, अशोक हडालिया, राजू पवार, सुरेखा कांबळे आदींचा समावेश आहे.

सेवानिवृत्त होणा-या अधिकारी व कर्मचा-यांनी आपले अर्धे आयुष्य मनपा सेवेसाठी दिले, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आभार मानतो, अशा शब्दांत स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.