Pimpri News : मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याविरोधात ‘आप’ची निदर्शने

एमपीसीन्यूज : मोदी सरकारच्या शेतकरी विरुद्ध धोरणाचा आम आदमी पार्टी तर्फे आज, गुरुवारी निषेध करण्यात आला. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी येथील डॉ. आंबेडकर पुतळा चौक येथे काळ्या फिती लावून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी विरोधी विधेयक बाजार समिती संपवणारे आहे. बाजार राहिला नाही तर मोठे भांडवलदार शेतकऱ्यांना पिळून काढतील व भिकेला लावतील, अशी भीती आपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अनुप शर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.

_MPC_DIR_MPU_II

तसेच हा कायदा छोट्या विक्रेत्यांनाही घातक आहे. उद्या घाऊक बाजारच राहिला नाही तर छोट्या विक्रेत्यांना अंबानी आणि अदानी सारख्या भांडवलदारांच्या गोदामामधूनच माल घ्यावा. त्यावेळी हे बडे भांडवलदार त्यांना दुजाभावाची वागणूक देतील. त्यामुळे छोट्या विक्रेत्यांनी सुद्धा शेतकऱ्यांसह या विधयेकाला विरोध करावा, असे आवाहन आपचे प्रवक्ते कपिल मोरे यांनी केले.

यावेळी ‘आप’चे राघवेंद्र राय, स्वप्नील येवले, राजेंद्र काळभोर, स्मिता पवार, वहाब शेख, सागर सोनवणे, सारफराज मुल्ला, नंदू नारंग आदी पदाधिकरो व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.