Pimpri News : ॲड. जया उभे यांना ‘इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड’ जाहीर

0

एमपीसीन्यूज : नाशिक येथील निर्वाण फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड -2021 च्या पुरस्करांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या मध्ये विश्वविक्रम नोंदविणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा पुरस्कार पिंपरी-खराळवाडी येथील ॲड. जया उभे यांना जाहीर करण्यात आला आहे.

कोविड- 19 ची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर नाशिक येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात ॲड. उभे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

निर्वाण फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश आंबेडकर यांनी ॲड. उभे यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

दरम्यान, ॲड. उभे यांनी खडतर परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. आतापर्यंत त्यांनी ५२ शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करुन दोन विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदविले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत असंख्य संस्था आणि संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment