Pimpri News: महापालिकेच्या स्वच्छता स्पर्धेत चिंचवडमधील अखिल मंडई प्रथम

गृहनिर्माण संस्थेत किवळेतील लिटील अर्घ मासुळकर सोसायटी प्रथम

एमपीसी न्यूज – स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ हॉटेल्स, शाळा, हॉस्पीटल्स, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई व शासकीय कार्यालये या सहा गटामध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धांचे निकाल जाहीर केले आहेत. गृहनिर्माण संस्थेत किवळेतील लिटील अर्घ मासुळकर सिटी आणि स्वच्छ मंडई या गटात चिंचवडच्या अखिल मंडईने स्वच्छता स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

स्वच्छ सर्वेक्षण 2021 शहरांमध्ये सुरु झाले आहे. व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे. याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवाद साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे, हा सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू आहे.

याकरिता महापालिकेच्या क्षेत्रामधील   स्वच्छ हॉटेल्स, शाळा, हॉस्पीटल्स, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई व शासकीय कार्यालये या सहा गटामध्ये स्वच्छता स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

परिसर स्वच्छता, शौचालय सुविधा, स्वच्छता साधनांचा वापर, ओला व सुका कचरा कचरा वर्गीकरण, पायाभुत सुविधा, स्वच्छता ऍप डाऊनलोड इत्यादी निकषांच्या आधारे सहभागी स्पर्धकांना गुणांक देण्यात आले. प्राप्त झालेल्या शाळा, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई व शासकीय कार्यालये यांच्या अहवालाचे गुणांकनानुसार गुणाक्रमांक काढण्यात आलेले आहेत.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे !

स्वच्छ शाळा :- (माध्यमिक विभाग)

महापालिका माध्यमिक विद्यालय खराळवाडी, माध्यमिक विद्यालय केशवनगर, माध्यमिक विद्यालय थेरगाव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. पिंपळेगुरव येथील माध्यमिक विद्यालयाने द्वितीय क्रमांक, पिंपळे सौदागर येथील माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

स्वच्छ गृहनिर्माण संस्था :- लिटील अर्घ मासुळकर सिटी किवळे (ब क्षेत्रीय कार्यालय) – प्रथम क्रमांक, सिल्वर लॅन्ड हौसिंग सोसायटी फेज 3 रावेत (ब क्षेत्रीय कार्यालय) – द्वितीय क्रमांक, आदि आम्मा बिल्स काळेवाडी (ब क्षेत्रीय कार्यालय) – तृतीय क्रमांक, के.डी.एम. प्लॅनेट ए/बी काळेवाडी (ब क्षेत्रीय कार्यालय) तृतीय क्रमांक

स्वच्छ मंडई : अखिल मंडई चिंचवड – ब क्षेत्रीय कार्यालय – प्रथम क्रमांक, अखिल कावेरी भाजी मंडई वाकड – ड क्षेत्रीय कार्यालय – द्वितीय क्रमांक, वक्रतुंड भाजी मंडई कृष्णानगर – फ क्षेत्रीय कार्यालय – तृतीय क्रमांक

स्वच्छ शासकीय कार्यालय :- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, इंद्रायणीनगर भोसरी-‍ क क्षेत्रीय कार्यालय – प्रथम क्रमांक, आरटीओ ऑफिस सेक्टर नंबर 8 मोशी प्राधिकरण – क क्षेत्रीय कार्यालय – द्वितीय क्रमांक, अंमल पदार्थ विरोधी पथक (गुन्हे शाखा) मासुळकर कॉलनी – क क्षेत्रीय कार्यालय – तृतीय क्रमांक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.