pimpri News: ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे अंदाजपत्रक सादर
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे 2020-2021 चे सुधारित व 2021-2022 चे 69 कोटी 56 लाख 29 हजार रुपयांचे मूळ अंदाजपत्रक क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी प्रभाग समिती अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांच्याकडे सादर केले.
नेहरुनगर येथील ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या विशेष समिती सभेत हे अंदाज पत्रक सादर करण्यात आले. सन 2020-21 चे 57 कोटी 4 लाख 39 हजार 960 रुपयांचे सुधारीत अंदाजपत्रक व 2021-2022 या आर्थिक वर्षाचे 69 कोटी 56 लाख 29 हजार रुपयांचे मूळ अंदाजपत्रक सादर केले आहे.
प्रभाग समिती अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक राहुल जाधव, वसंत बोराटे, नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका सस्ते, यशोदा बोईनवाड, नम्रता लोंढे, राहुल भोसले, समीर मासूळकर, प्रशासन अधिकारी नाना मोरे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, नितीन देशमुख, लेखाधिकारी वसंत उगले आदी उपस्थित होते.