Pimpri news: रस्ते, गटर साफसफाईची निविदा रद्द करा – विलास लांडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील दैनंदिन रस्ते, गटर साफसफाईच्या निविदेत जाचक अटी आहेत. त्यामुळे स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थाना निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येत नाही. त्यासाठी जुनी निविदा रद्द करावी. किंवा शुद्धीप्रत्रक काढून प्रतीक्षा यादीद्वारे कामाचे समसमान वाटप करावे, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत लांडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरातील दैनंदिन रस्ते, गटर साफसफाई यांत्रीकी पद्धतीने साफसफाईसाठी अ,ब,क,ड,ई,फ,ग, आणि ह या 8 क्षेत्रिय कार्यालयानिहाय निविदा मागविल्या आहेत.

त्यात 8 प्रभाग स्तरावर व 500 लोकांची कामे केलेली अट तसेच निविदेचा फार्म फी 4250 प्रती प्रभाग, बयाणा व अनामत रक्कम भरणे आवश्यक असल्याचा नमूद केले आहे.

या जाचक अटीमुळे स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांना निविदा भरताना अडचणी निर्माण होणार आहेत. अशा कामांचे कंत्राट सेवा सहकारी संस्थाना देणे बंधनकारक आहे. असे असताना देखील खासगी कंपन्यांना अशी कामे दिली जात असल्याचे दिसून येत आहेत.

सरकारच्या आदेशानुसार बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना आर्थिकदृष्टया सक्षम व बळकट करणे असे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थाना काम मिळण्यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे.

त्यामुळे सध्या काढलेली निविदा प्रक्रीया रद्ध करावी. सन 2014-15 च्या निविदेप्रमाणे सहभाग नोंदवून प्रतिक्षा यादी मधील सहकारी संस्थाना समसमान पद्धतीने कामे द्यावे, असे लांडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.