Pimpri News : लायन्स क्लब व हेलपिंग हॅन्डच्या वतीने आर्थिक दुर्बलांना मिठाई, कपडे वाटप

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब पिंपरी व हेलपिंग हॅन्ड या सामाजिक संस्थेच्या वतीने वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना मिठाई, कपडे आणि ब्लॅंकेट यांचे वाटप करून अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली.

यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष नेहूल कुदळे, रिजन चेअर पर्सन लायन सुदाम मोरे, झोन चेअर पर्सन समीक्षा मंधान, कमल मलकानी, हरेश मंधान, पिंटो मीरानी, सुरेंद्र मंगवाणी, आकांशा संचेती, हेमांशी सुवर्णा, हेमाली आदी उपस्थित होते.

अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करून आर्थिक दुर्बल लोकांना शुभेच्छा देण्यात आल्या. दिवाळीनिमित्त अनपेक्षित मिळालेल्या भेटवस्तूमुळे गोरगरीब नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.