Pimpri News: वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिल्ड सर्व्हीलन्सवर सव्वाकोटीचा खर्च

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिल्ड सर्व्हीलन्सवर टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीमकरिता ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत भाडेतत्वावर पुरविण्यात आलेल्या 64 वाहनांपोटी सहा महिन्यात सव्वाकोटीचा खर्च झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका वैद्यकीय अधिकारी यांच्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय फिल्ड सर्व्हीलन्स टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीमकरिता लागणारी आवश्यक 64 वाहने पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) भोसरीतील शिवसमर्थ ट्रॅव्हल्स यांच्याकडून भाडेतत्वावर पुरविण्यात आली आहेत.

त्यांचे बील आरटीओच्या दरानुसार देण्याबाबत कळविले आहे. 20 मार्च ते 31 मे पर्यंत थेट पद्धतीने भाडेतत्वावर पुरविण्यात आलेल्या वाहनांपोटी प्रत्यक्ष खर्च 47 लाख 95 हजार रूपये आला आहे. 22 जुलै रोजी स्थायी समिती सभेने 47 लाख 95 हजार रूपये खर्चास मान्यता दिली आहे.

1 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत 64 वाहनांपोटी 1 कोटी 23 लाख रूपये खर्च झाला आहे. पूर्वीचा 66 हजार रूपये खर्च धरून एकूण 1 कोटी 24 लाख रूपये इतका खर्च झाला आहे. हा खर्च ‘वाहने भाड्याने घेणे’ या लेखाशिर्षातून करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.