Pimpri News: मिळकत करातील महापालिका विलंब दंडाची रक्कम माफ करा- राष्ट्रवादी, शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज – मिळकत कर बिलामधील महापालिका शास्तीची (विलंब दंड) 100 टक्के रक्कम माफ करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अवैध बांधकामावरील शास्तीकर वगळून मूळ मालमत्ताकराचा भरणा स्वीकृत करण्यास ’विशेष बाब’ म्हणून पिंपरी – चिंचवड महापालिकेस मान्यता दिली आहे.

गेली अनेक वर्ष शास्तीकरामुळे नागरिक कर भर नव्हते. परंतु, आता मूळ कर स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे नागरिक मूळकर भरण्यास तयार आहेत. मात्र, मिळकत करांमध्ये महापालिका शास्तीची रक्कम देखील काही प्रमाणात आहे.

त्यासाठी महापालिका शास्तीकर (विलंब दंड) 100 टक्के माफ करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वाघेरे, कलाटे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.