Pimpri News : इंधन दरवाढीवरुन मोदी सरकारला सळो की पळो करून सोडा : सत्यजीत तांबे

वाढत्या इंधन दरवाढी विरोधात राज्यव्यापी सह्यांच्या मोहीमेस पिंपरीत सुरुवात

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल डिझेल चे भाव कमी झाले असताना मोदी सरकारकडून सातत्याने दरवाढ केली जात आहे. मोदी सरकार पेट्रोल डिझेलच्या नावाखाली जनतेची लूट करत आहे. 40 रूपायाच्या पेट्रोलला 105 रूपायांचा भाव, 400 रूपायाच्या गॅस सिलेंडरला 850 चा भाव, तर 50 रूपायाच्या डिझेलला जवळपास 100 रूपायाचा भाव झाला आहे. अशा प्रकारे गोरगरीब जनतेच्या संसारावर घाला घालण्याचे काम मोदी सरकार करत आहे. महागाईवरुन मोदी सरकारला सळो की पळो करून सोडा, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले.

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने 11 ते 15 जुलै पर्यंत राज्यव्यापी स्वरूपात नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. दैनंदिन स्वरूपात आपल्या उपजीविकेत व्यस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासाबाबत व उद्रेकाबाबत नागरिकांच्या भावनांना आवाज मिळवून देण्यासाठी युवक काँग्रेसने राज्यस्तरीय स्वरूपात या मोहीमेस सुरूवात केली आहे.

या मोहीमेचा पिंपरी-चिंचवड शहरातील शुभारंभ तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. पिंपरी चौकाजवळील एचपी पंपावर या मोहिमेचा आरंभ करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तांबे म्हणाले, “वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने “एकच लक्ष मोदी सरकार विरोधात एक कोटी साक्ष” अशा एक कोटी सह्या गोळा करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. ही मोहीम यशस्वी पणे सुरू आहे. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातला हा जनतेचा आवाज मोदी सरकार विरोधातला हा आवाज काँग्रेस कार्यकर्ते करतील. पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांपर्यंत आम्ही मोठ्या प्रमाणात पोहचू त्यांच्या भावना जाणून घेवून त्या दिल्ली तील निगरगट्ट मोदी सरकारपर्यंत पोहचवू व मोदी सरकारला व भाजपा नेत्यांना सळो कि पळो करून सोडावे.

शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहरात विविध ठिकाणी नागरिकांशी संपर्क साधून महागाई विरोधातील या आंदोलनात नागरिकांच्या सहाभागासाठी सह्या घेऊन पाठिंबा घेण्यात येणार आहे. या मोहीमेस नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांचा स्वयं सहभाग या मोहिमेचे महत्व दर्शवत होता. नागरिकांनी उत्सुफूर्तपणे या मोहीमेत सहाभागी होऊन केंद्रातील भाजपा सराकरप्रती आपला निषेध नोंदवावा. या मोहीमेतंर्गत नागरिकांचे नाव,मोबाईल क्रंमाक व सही स्वाक्षरी पुस्तीकेत घेण्यात येणार आहे.

या प्रसंगी इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष कैलास कदम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी शिवराज मोरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव व पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे प्रभारी अक्षय जैन, युवक पिंपरी-चिंचवड काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे शहाराध्यक्ष डॅा. वसीम इनामदार, काँग्रेस सोशल मिडीयाचे शहराध्यक्ष आयुष मंगल, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव कौस्तुभ नवले, काँग्रेस नेते अशोक काळभोर, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस अपूर्वा इंगवले, योगेश नायडू, अलोक लाड, विशाल सरवदे, मिलिंद बनसोडे, संतोष देवकर, बाबा गायसमुद्रे, स्वप्निल बनसोडे, अर्णव कामठे, तेजस पाटील, अनिकेत अरकडे, करणसिंग गील, रोहित तिकोणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.