Pimpri news: लायन्स क्लब तर्फे आत्मनिर्भर भारत योजनेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब डिस्ट्रीक्ट 3234 डी 2 च्या शैक्षणिक विभागातर्फे आत्मनिर्भर भारत योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्याअंतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे डाॅ. प्रसाद खंडागळे यांनी सांगितले.

पुणे जिल्हातील प्रत्येक तालुक्यात अवकाश निरीक्षण केंद्र सुरू केले जाणार आहे. पहिले केंद्र जेजुरी तर दुसरे केंद्र शिरगांव मावळ येथील शारदाश्रम शाळेत होणार आहे. यासाठी हेन्कल इंडिया कंपनीने ‘सीएसआर फंड’ दिला आहे. लायन्स क्लब डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अभय शास्त्री यांच्या हस्ते एक लाख रुपयांचे टेलिस्कोप व इतर साहित्य शारदाश्रम विघालयाचे कापरे सर व संतोष चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

दुस-या उपक्रमात पुण्यातील प्रसिध्द अशा गांधर्व महाविद्यालायात ग्रामीण भागातील संगीत शिकविणा-या शिक्षकांसाठी मदत केली जाणार आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानी गावातच शाळेत शिकवून आत्मनिर्भर व्हायचे आहे. याप्रसंगी गांधर्व महाविलयाचे प्राचार्य प्रमोद मराठे यांनी आर्थिक मदतीचा धनादेश स्वीकारला.

अनेक गरीब मुलींना आर्थिक निधी अभावी राज्य व राष्ट्रीय पातळीवर परफार्म करता येत नाही. यासाठी पुणे येथील महाराष्ट्र मंडळातील तसेच नाशिक, अहमदनगर येथील मुलींना कीट, शुज तसेस शारीरीक तंदुरीस्तीसाठी साहित्य खुराक देण्यात येणार आहे.

याप्रसंगी पल्लवी गुडसे या राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूस कीट देऊन सन्मानीत करण्यात आले. प्रशिक्षक राजेंद्र कदम उपस्थित होते.

चौथ्या उपक्रमात आदिवासी इंजिनिअरिंग मुलांना 5 लॅपटाॅप व पुण्यातील गरीब विद्यार्थ्यांना लॅपटाॅप देण्यात आले. सिध्देश जाधव याने याचा स्वीकार केला. ग्रामीण भागातील मुलांना लॅपटाॅप, ई-लर्निग सुविधा देणार असल्याचे सांगण्यात आले.

पाचव्या उपक्रमात पुणे, नगर नाशिक जिल्हातील मुलींसाठी आर्मी नेव्ही भरतीसाठी मोफत मार्गदर्शन व ट्रेनिंग देण्यात येणार आहे. यातुन मुली आत्मनिर्भर होतील.

सहाव्या उपक्रमात गरीब कुटुंबातील मुलींचा शैक्षणीक खर्च विविध लायन्स क्लब करणार आहे. याची सुरूवात कटारिया हायस्कुल येथील वस्तीत रहाणा-या दहा मुलींच्या शैक्षणिक खर्चाचा धनादेश वाघ सर यांना देण्यात आला.

तर, सातव्या उपक्रमात वेदातील सायन्स या विषयी अनेक उपक्रम लाॅकडाऊन उठल्यानंतर करण्यात येणार आहेत. या प्रसंगी लायन्स शैक्षणिक विभाग प्रमुख यांनी ग्लोबल मिशन संस्थेशी सहकार्य करुन जिल्हामध्ये 5 ठिकाणी अशी अवकाश केंद्र काढली जाणार असल्याची माहीती डाॅ. प्रसाद खंडागळे यांनी दिली. यातून भविष्यात संशोधक बनवून आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी प्रयत्न आहे.

प्रांतपाल अभय शास्त्री यांनी याप्रसंगी या उपक्रमांचे कौतुक करुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील एका अवकाशदर्शन शाळेच्या खर्चाची घोषणा केली.

लायन्स ग्रामीण शैक्षणिक विभाग प्रमुख लायन प्रकाश नारके, लायन विलास काळे, डाॅ. विशाल कुंभारे, गांधर्व महाविलाय प्राचार्य पंडित प्रमोद मराठे , सहकारनगरचे अध्यक्ष ला. प्रताप शिंदे, नंदू जाधव व लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.