Pimpri news: सिंधी समाज संस्थेच्या शहराध्यक्षपदी मनोहर जेठवाणी

एमपीसी न्यूज – ‘विश्व सिंधी सेवा संघम’, या सिंधी समाज संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या अध्यक्षपदी मनोहर जेठवाणी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजू मनवानी आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल सजनानी यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

दीपक लोहाना (उपाध्यक्ष), अजित कंजवानी (सचिव) हिरानंद शर्मा (खजिनदार), मनोज पंजाबी (जनसंपर्क) यांचीही शहर कार्यकारीणीत निवड करण्यात आली.

मनोहर जेठवाणी यांनी आजपर्यंत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सिंधी समाजाचे विविध सण आणि सामाजिक उपक्रमात ते सतत कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राजू मनवानी यांने सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.