Pimpri News : मनसे जनहित कक्षाच्या शहर उपसंघटकपदी मिलिंद सोनवणे

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर ( पिंपरी विधानसभा) उपसंघटकपदी कामगार नेते मिलिंद सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जनहित कक्षाचे अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. यावेळी जनहित कक्षाचे राजू भालेराव आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मिलिंद सोनवणे गेली अनेक वर्षांपासून मनसेत सक्रिय आहेत. जय महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या सोनावणे यांनी बांधकाम कामगारांसह असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्यावर मनसे जनहित कक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर उपसंघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी कक्षाची ध्येय धोरणे व कार्यक्रम पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रात राबविण्यासह मराठी बांधव, भगिनी आणि मातांना अभिमान वाटेल, असे कार्य करण्याची ग्वाही सोनावणे यांनी निवडीनंतर दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.