Pimpri News : रिक्षा चालक, फेरीवाले, घरकाम महिला यांचे सोमवारी आंदोलन

एमपीसी न्यूज – कष्टक-यांना जाहीर केलेली आर्थिक मदत कोणताही अडथळा निर्माण न करता देण्यात यावी या मागणीसाठी रिक्षा चालक, फेरीवाले, घरकाम करणा-या महिला सोमवारी (दि.14) सकाळी 11 वाजाता महापालिका भवनासमोर आंदोलन करणार आहेत.

कष्टकरी जनता आघाडी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत ,टपरी ,पथारी, हातगाडी पंचायत, घरकाम महिला सभा, रिक्षा ब्रिगेड यांच्या वतीने बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

महापालिकेच्यावतीने लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, फेरीवाले, गटई कामगार, जिम ट्रेनर यांना तीन हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. मात्र, महापालिका आयुक्त आणि प्रशासन ही मदत देण्यात खोडा आणत आहेत. मनपाच्या या लहरी कारभाराविरोधात मनपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.