Pimpri News: महापालिका उपायुक्त मंगेश चितळे यांची पदोन्नतीने मुंबईत बदली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपआयुक्तपदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले मंगेश चितळे यांची उपआयुक्त,नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई येथे पदोन्नतीने बदली झाली आहे. राज्य सरकारने ही बदली केली आहे. चितळे यांना आज (शनिवारी) महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

‘सीओ’ केडरचे मंगेश चितळे यांची 12 एप्रिल 2018 रोजी प्रतिनियुक्तीवर महापालिकेत नियुक्ती झाली होती. त्यांनी सहाय्यक आयुक्त म्हणून प्रशासन, भूमी आणि जिंदगी विभागाची जबाबदारी पार पाडली. चितळे यांना 14 ऑक्टोबर 2020 रोजी उपायुक्तपदी बढती मिळाली होती. उपायुक्त म्हणून त्यांनी मध्यवर्ती भांडार, आकाश चिन्ह परवाना विभागाचा कारभार सांभाळला.

गरविकास खात्याने मंगेश चितळे यांना मुख्याधिकारी गट-अ संवर्गातून मुख्याधिकारी गट-अ (निवडश्रेणी) संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती दिली. त्यांना उपायुक्त,नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई येथे पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. त्यामुळे चितळे यांना पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेमधून कार्यमुक्त करण्यात आले.

आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.