Pimpri News : महापालिकेने पीएमपीएमएलला दिली 12 कोटींची संचलन तूट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे महानगर परिवहन मंडळाला (पीएमपीएमएल) सप्टेंबर 21 साठी संचलन तुटीकरीता 12 कोटी रुपये दिले आहेत. तसचे शहरातील विविध विकास कामांसाठी येणा-या 25  कोटी रुपयांच्या कामाला मान्यता देण्यात आली.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज (बुधवारी) स्थायी समितीची साप्ताहिक ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. नितीन लांडगे होते.

विषयपत्रिकेवर 25 विषय होते. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनीसःरण नलिका मॅनहोल चेंबरची साफसफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करण्यासाठी येणा-या 1 कोटी 29 लाख, प्रभाग क्रमांक 8 मधील रस्त्याचे अर्बन डिझाईन करून सुशोभिकरण करणे आणि विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणा-या 92 लाख 37  हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक-किवळे बीआरएस कॉरिडोरवरील शिंदेवस्ती येथे उड्डाणपूल बांधणीच्या कामात अडथळा ठरणारे इएचव्ही पायलॉन शिफ्ट करण्यासाठी येणा-या 14 कोटी 88 लाख रुपयांच्या खर्चास,  पिंपळेसौदागर येथील कोकणे चौक ते काटे पाटील चौकापर्यंत उच्च क्षमता द्रुतगती मार्गाच्या क्षेत्रात जॉगिंग ट्रॅक वृक्षारोपण (लिनिअर अर्बन गार्डन) उद्यान विषयक कामाची देखभाल करण्यासाठी येणा-या 71 लाख 33 हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 10 मधील महापालिका व दवाखाना इमारतीची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याकामी येणा-या 25 लाख 50 हजार रुपये, ‘ह’ प्रभागातील संत तुकारामनगर व कासारवाडी टाकी परिसरातील वाॅल्व्ह ऑपरेशन करण्याकरिता मजूर पुरविण्याकामी येणा-या 56 लाख 50 हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.