Pimpri News: महापालिकेची रुग्णालये हाउसफुल्ल; दोन दिवसांत जम्बो कोविड केअर सेंटर सुरु होणार

महापौर उषा ढोरे यांची माहिती

एमपीसी न्यूज – वाढत्या रुग्णसंख्येमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची रुग्णालये हाउसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 816 बेडचे अद्ययावत असलेले जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. तिथे सर्व यंत्रणा उपलब्ध असून येत्या दोन दिवसात जम्बो कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार असल्याची माहिती, महापौर उषा ढोरे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेची रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. बालनगरी, अॅटो क्लस्टर येथील कोविड केअर सेंटर, वायसीएम, पिंपरीतील नवीन जिजामाता आणि भोसरीतील नवीन रुग्णालय हाऊस फुल झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पीएमआरडीएतर्फे पिंपरीतील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 816 बेडचे अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. 1 सप्टेंबर 2020 पासून हे जम्बो कोविड केअर सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सुरु झाले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने 1 जानेवारी पासून जम्बो सेंटर बंद करण्यात आले होते.

आता पुन्हा शहरातील रुग्णसंख्या वाढली आहे. अचानक रुग्णसंख्या वाढली तर, उपलब्धतता पाहिजे. जम्बो कोविड केअर सेंटर महापालिका हद्दीत आहे. कोरोना कोविड केअर सेंटर भाड्याने घेवून महापालिका चालविणार आहे. येत्या दोन दिवसात जम्बो सेंटर चालू केले जाईल. तशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे महापौर ढोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.