Pimpri News: उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या पंकज भालेकर यांचा अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. महापालिकेत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

केशव घोळवे यांनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी आज (शुक्रवारी) तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज भरला आहे.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक अजित गव्हाणे, प्रवीण भालेकर,  नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, सुलक्षणा धर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार की माघार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उपमहापौर निवडणुकीसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मंगळवारी (दि.23) रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा होणार आहे. पुणे  महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.