Pimpri Corona Update : सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजाराच्या आत; आज 194 नवीन रुग्णांची नोंद

शहरातील 485 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 194 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 485 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट होत असून सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजाराच्या आत आली आहे.

शहरातील 4 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 9 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 262 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 55 हजार 733 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 994 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 273 रुग्ण गृहविलगीकरणात असून 721 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 34 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 416 आहेत. आज दिवसभरात 11 हजार 323 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 71 हजार 217 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.