Pimpri news: इंदिरा गांधी जयंतीनिमित्त युवक काँग्रेसचा वृध्द सेवा उपक्रम

एमपीसी न्यूज – भारताच्या पहिल्या माहिला पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त पिंपरी- चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसकडून वृध्द सेवा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जेष्ठांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

बिजलीनगर येथील संत मोनीबाबा आनंद आश्रम येथे शहर युवक काँग्रेसच्या वतीने दैनंदिन स्वंयपाकासाठी आवश्यक असलेले साहित्य व अन्नधान्य देऊन वृध्द सेवा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये 20 किलो साखर, 10 किलो मैदा, 10 किलो शेंगदाणे, 10 किलो मसूर डाळ, 5 किलो छोले, पापड व बिस्किटांची पाकिटे असा जिन्नस देण्यात आला.

या प्रसंगी वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. उपक्रमाबाबत ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले व आभार मानले.

यापूर्वी सकाळी अकरा वाजता बीआरटी रोड काळेवाडी येथील पालिका आरोग्य कार्यालयात इंदिरा गांधी यांची प्रतिमा युवक काँग्रेसच्या वतीने नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते भेट देण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव कौस्तुभ नवले, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, दिपक भंडारी, युवक काँग्रेसचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष हिराचंद जाधव, युवक काँग्रेसचे भोसरी विधानसभा अध्यक्ष नासीर चौधरी, अनिल सोनकांबळे, प्रविण जाधव, निलेश वाघमारे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.