Pimpri News : ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रश्नांवर उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांशी सकारात्मक चर्चा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने ड्रायव्हिंग स्कूलच्या विविध प्रश्नांबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्यासोबत बुधवारी (दि.30, डिसेंबर) बैठक घेण्यात आली होती. ड्रायव्हिंग स्कूल संबंधित विविध प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारी सकारात्मक असल्याचे आदे यांनी यावेळी सांगितले.

नवीन वर्षात परिवहन कार्यालयातील परवाना विषयक कामकाज गतिमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. जास्तीत जास्त उमेदवारांना शिकाऊ व पक्का परवाना देण्याचा प्रयत्न कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरलं आहे.

कामात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांना परिवहन कार्यालय कामकाजाची माहिती देण्यासाठी प्रत्येक विभागात एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याबाबत निर्णय या बैठकीत घेण्यात आला. अल्ट्रा मॉडेल ड्रायव्हिंग चाचणीमुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय परीक्षा होत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

यामुळे उमेदवारांची स्किल चाचणी घेतली जात असून, मोटार ड्रायव्हिंग शिकवणी शुल्क 7,500 ते 8,500 होणार आहे.

रस्ता सुरक्षा इंधन बचत, नो हॉर्न ओके प्लिज व ट्रेन द ट्रेनर विविध उपक्रम राज्य असोसिएशन वतीने राज्यातील 51 आरटीओमध्ये राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी केले.

या बैठकीला पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक परिवहन अधिकारी मनोज ओतारी,  अजय अवताडे, महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे महासचिव यशवंत कुंभार, खजिनदार निलेश गांगुर्डे, पिंपरी-चिंचवड असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय काळे, न्यू पिंपरी-चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यक्ष अनंत कुंभार, स्वप्निल पवार, अरविंद इंदलकर, बापूसाहेब देशमुख, विजयसिंह परदेशी, मारुती वानखेडे, दिनेश टटू, संतोष आपोळकर आदी   उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.