Pimpri News: कोरोना अ‍ॅन्टीजेन टेस्टसाठी आठ हजार किटची खरेदी

एमपीसी न्यूज – कोरोना रूग्णांचे तातडीने निदान व्हावे, याकरिता महापालिकेमार्फत रॅपिड अन्टीजेन टेस्टचे आठ हजार किट खरेदी करण्यात येणार आहेत. या आठ हजार किटद्वारे कोरोनाच्या तब्बल दोन लाख चाचण्या होऊ शकणार आहेत. त्यासाठी 50 लाख रूपये खर्च होणार आहे.

शहरातील कोरोना बाधितांचा आकडा सध्या पावणेतीन लाखांवार पोचला आहे. शहरातील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी रॅपिड अन्टीजेन टेस्ट किट खरेदी करण्याकरिता निविदा नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती.

त्यानुसार, दहा निविदा धारकांनी दरपत्रक सादर केले. त्यामध्ये सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी प्रति टेस्ट 25 रूपये 15 पैसे अधिक 5 टक्के जीएसटी इतका दर सादर केला. हा दर अंदाजित दरापेक्षा 37.04  टक्क्यांनी कमी आहे.

सध्या बाजारपेठेत कोरोना अ‍ॅन्टीजेन टेस्ट किटच्या किमती पूर्वीपेक्षा खूपच कमी झाल्या आहेत. त्या अनुषंगाने सुदर्शन फार्मा यांनी सादर केलेल्या दराप्रमाणे आठ हजार किट खरेदी करण्यात येणार आहेत.

प्रति किट 25 टेस्ट यानुसार आठ हजार किटद्वारे कोरोनाच्या तब्बल दोन लाख चाचण्या होऊ शकणार आहेत. त्यानुसार, या किट खरेदीकरिता 50 लाख 30 हजार रूपये अधिक पाच टक्के जीएसटी इतका खर्च होणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.