Pimpri news: पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप बेलसरे यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप बेलसरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती.

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची पंचवार्षिक निवडणुकीची मुदत 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेली होती. परंतु, कोरोना महामारीमुळे शासनाची निवडणुकीला परवानगी नसल्याकारणाने ती पुढे ढकलण्यात आली होती.

1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतुल अडसरे यांनी काम पाहिले. ही निवडणूक ही अत्यंत उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सदर निवडणुकीसाठी वॉर्ड रचना करून वॉर्डप्रमाणे उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडून आलेल्या संचालकापैकी खालील पदाधिकारी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

संदीप बेलसरे (अध्यक्ष), संजय जगताप (उपाध्यक्ष), विनोद नाणेकर (उपाध्यक्ष), जयंत कड ( सचिव). प्रविण लोंढे (सहसचिव), संजय ववले (खजिनदार), विजय खळदकर (प्र.प्रमुख), संजय सातव (संचालक ), नवनाथ वायळ (संचालक ), विनोद मित्तल (संचालक ), हर्षल थोरवे (संचालक ), प्रमोद राणे (संचालक ), भारत नरवडे (संचालक ), अतुल इनामदार (संचालक ), सचिन आदक (संचालक ) यांची पदाधिकारी व संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली.

सदर संचालक मंडळाची मुदत   पुढील पाच वर्षासाठी असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.