Pimpri News : एमआयडीसीमधील कचरा संकलनासाठी घंटागाड्या पुन्हा सुरू करा : अभय भोर

एमपीसी न्यूज – एमआयडीसीमधील कचरा संकलनासाठी पुन्हा घंटागाड्या सुरू कराव्यात. एमआयडीसीसाठी स्वतंत्र कचरा संकलन केंद्र उभारावे, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष भोर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची आज (सोमवारी) भेट घेतली. महापालिका क्षेत्रात औद्योगिक परिसर मोठ्या प्रमाणात आहे. 22 ब्लॉक आहेत आणि पाच ते सहा हजार इंडस्ट्रीज आहेत. परंतु, दैनंदिन साफसफाई केलेला कचरा टाकण्यासाठी उद्योजकांना लांब अंतरावर जावे लागते.

परिणामी काही ठिकाणी कचरा फेकला जातो. स्वच्छ एमआयडीसी ठेवण्यासाठी पूर्वी फोरमच्या पाठपुराव्यानंतर घंटागाडी सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु गेले एक ते दीड वर्ष झाले. त्या बंद केल्या.

त्यामुळे उद्योजकांना कचरा टाकण्यासाठी लांब अंतरावर जावे लागते. तसेच कचरापेटी यांची सुद्धा टंचाई असल्याने. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परिसरातील कचरा पेट्यांमध्ये बाहेरील कचरा आणून टाकला जातो. परिसरात पंधरा पंधरा दिवसांनी झाडलोट केली जाते. ही झाडलोट दैनंदिन करावी.

या मागण्यांबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित अंमलबजावणी करता येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती भोर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.