Pimpri News : शिखर फाऊंडेशनकडून ‘तैल-बैला’वर यशस्वी चढाई

0

एमपीसी न्यूज: पिंपरी-चिंचवडमधील ‘शिखर फाऊंडेशन’च्या ॲडव्हेंचर क्लबने तैल-बैलाच्या उंच कातळ भिंतीवर चारही बाजूने प्रस्तरारोहण करण्याची एक अनोखी मोहीम नुकतीच यशस्वी केली. शिखर टीममधील नवतरुणांनी म्हणजेच दुस-या फळीतील क्लाईंबर्सने चारही बाजूने यशस्वी चढाई करत इतिहास घडवला आहे.

रॉक क्लाईंबर विक्रांत शिंदे यांच्या मर्गदर्शनाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. या उंच कातळ भिंतीची उंची 300 फूट असून, रुंदी काही ठिकाणी 25 ते 30 फूटापासून ते 50 त्र 60 फूटांपर्यंत आहे. या भिंतीचे दोन भाग झालेले आहेत. क्रमांक 1, 2 व दक्षिण बाजूच्या क्रमांक 4 भिंतीवरची चढाई अवघड श्रेणीतील असून क्रमांक 3 च्या भिंतीवरची चढाई मध्यम प्रकारांतील आहे.

तरुणांमधील साहसी वृत्ती जोपासली जावी आणि त्यांना प्रस्तरारोहणाचे तंत्रशुद्ध धडे मिळावेत यासाठी संस्थेने खासकरून 18 ते 22 वयोगटातील युवकांसाठी दोन दिवसीय मोहीम आयोजित केली होती.

शिखर फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक तापकीर, अनुभवी प्रस्तरारोहक विक्रांत शिंदे, प्रवीण पवार आणि लिड क्लाईंबर संजय बांठे यांनी तरुणांना मोलाचे मार्गदर्शन केले.

एकाचवेळी चार भिंतीवर चढाई करण्याचा बहुमान टीमने मिळवत इतिहास घडवला. मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रविण पवार, संजय भाटे, सुधीर गायकवाड, शिवाजी आंधळे, जयपाल दगडे, वैभव देवकर, स्वप्निल आंधळे, शरद महापुरे, ऋतिक मोरे, नितीन टाव्हरे, सुनील देवकर, योगेश बोरकर आणि उर्वरित शिखर टीमने योगदान दिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.