Pimpri News : साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना राबवा : नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारखे साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी डासांच्या उत्पत्तीस आळा बसण्यासाठी महापालिकेने उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशी मागणी माजी महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारखे साथीचे आजार पसरू नयेत, तसेच डासांच्या उत्पत्तीस आळा बसण्यासाठी खबरदारी म्हणून योग्य त्या उपयोजना राबवाव्यात. सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारखे डासांमुळे उद्भवणारे साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारखे साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी योग्य खबरदारी व उपाययोजना करण्याबाबतचे सूचना देण्यात याव्या, असे काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.