Pimpri News: शहरात आज 93 नवीन रुग्णांची नोंद, 201 जणांना डिस्चार्ज; 3 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 93 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली, तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 201 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महापालिका हद्दीतील दोन आणि पालिका हद्दीबाहेरील एक अशा तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये चिंचवड येथील 71 वर्षीय वृद्ध, दापोडीतील 32 वर्षीय पुरुष, पुण्यातील 74 वर्षीय वृद्ध महिला रुग्णाचा मृत्यू झाला.

शहरात आजपर्यंत 98 हजार 66 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 94 हजार 680 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1774 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 739 अशा 2513 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 598 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1043 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

इंग्लडहून आलेल्या एकाचा अहवाल प्रलंबित !

इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 7 प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) UK स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले होते. त्यात तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले, तर तिघांचे पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यांचे UK स्ट्रेन B.1.1.7 चा रिपोर्ट पॉझिटीव्ह असून तिघांची प्रकृती चांगली आहे. एकाचा अहवाल प्रलंबित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like