Pimpri news: संघटनेतील वाद बंद खोलीत बसून संपवायचे असतात, नाथाभाऊ ओपनली मांडतात – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – जीवंत माणसांच्या संघटनेत वाद असतात. ते वाद बंद खोलीत बसून संपवायचे असतात. नाथाभाऊ ओपनली मांडत आहेत. काही जण नाथाभाऊशी बोलत आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. फडणवीस यांनी मला त्रास दिला आहे. त्यामुळे त्यांचे नाव घेवून टीका करत आहे. सर्वांना क्लीन चीट दिली.

पण, मला दिली नाही. राजीनामा मी स्वतःहून दिला नाही, तर तो माझ्याकडून घेतला गेला, असे खडसे यांनी आज स्पष्ट केले आहे. नाना फडणवीसांचे बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहीत असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

या बाबत मोरवाडीतील पक्ष कार्यालयात आलेल्या पाटील यांना पत्रकारांनी छेडले असताना ते म्हणाले, संघटनेत वाद असतात. ते वाद बंद खोलीत बसून संपवायचे असतात. नाथाभाऊ ओपनली मांडत आहेत.

नाथाभाऊंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी ‘घरातील धुणी रस्त्यावर येवून धुवायला नको’, असे म्हटले आहे. काही जण नाथाभाऊशी बोलत आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे. फडणवीस यांनी आपली भूमिका वारंवार मांडली आहे.

पिंपरी-चिंचवड येथील एमआयडीसी मधील भूखंड प्रकरणात खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. दाऊद फाऊदमुळे द्यावा लागला नाही. त्यात 24 तासात क्लीन चिट दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी हे सविस्तर सांगितले आहे, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.