Pimpri corona Update: रुग्णवाढीचा आलेख कायम, शहरात आज 1 हजार 52 नवीन रुग्णांची नोंद

207 जणांना डिस्चार्ज, 15 मृत्यू : The graph of patient growth is maintained, 1 thousand 52 new patients are registered in the city today

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्ण वाढीचा आलेख कमी होताना दिसून येत नाही. शहराच्या विविध भागातील 1024 आणि पालिका हद्दीबाहेरील 28 अशा 1052 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) भर पडली आहे.

यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 31 हजार 643 झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 207 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  त्यामध्ये भोसरी (पुरुष 60 वर्षे, पुरुष 29 वर्षीय युवक), रहाटणी (स्त्री 70 वर्षे), आकुर्डी (पुरुष 51 वर्षे), थेरगाव (स्त्री 64 वर्षे, पुरुष 70 वर्षे, पुरुष 32 वर्षे), कासारवाडी (पुरुष 66 वर्षे), मोरेवस्ती चिखली (स्त्री 80 वर्षे), निगडी प्राधिकरण (स्त्री 89 वर्षे), जाधववाडी चिखली (पुरुष 65 वर्षे), नेहरुनगर पिंपरी (स्त्री 75 वर्षे), च-होली फाटा (पुरुष 81 वर्षे), चिंचवड (पुरुष 70 वर्षे), काळेवाडी (पुरुष 72 वर्षे)

शहरात आजपर्यंत 31 हजार 643 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 22 हजार 5 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 525  जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 117 अशा 642 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 6130 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.