Pimpri News : महापालिकेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती सर्वश्रृत असून त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार करत देशासाठी दिलेले योगदान त्यांच्या देशाभिमानाची साक्ष देतात.

सावरकरांनी अंधश्रध्दा, जातीभेद निर्मूलनासाठी केलेले कार्य, त्यांची मातृभूमीबद्दल असलेली ओढ, त्यांनी युवकांचे उभारलेले संघटन, अशा विविध कार्यातून सावरकरांनी वेगळा ठसा उमटविला. सावरकरांचा इतिहास देशभक्तीची साक्ष देत असून भारतीय इतिहासातले ते सुवर्णपान ठरले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.