Pimpri News : उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे महाडमधील दोनशे कुटुंबांना मदत

एमपीसी न्यूज – कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या टीमने ‘ऑन द स्पॉट’ पोचून जीवनावश्यक साहित्यांचे थेट वितरण केले.

फाऊंडेशनच्या माध्यमातून विवेक संजय भिसे, साहिल कापसे, योगेश चौधरी, ऋषिकेश होणे, विवेक नामदेव भिसे, राहुल मेहंदळे, संजय डांगे, श्रीकांत शिंदे, संतोष शिंदे, अभिजित भोसे आदी सदस्यांची टीम महाडमध्ये दाखल झाली होती.

फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपळे सौदागरमधील नागरिकांनी मदतीसाठी प्रचंड प्रतिसाद दिला. यामध्ये नागरिकांनी धान्य, कपडे, पाण्याच्या बाटल्या यांच्यासह विविध जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात मदत केली.

ही सर्व मदत घेऊन फाउंडेशनचे सदस्य महाड येथील पूरग्रस्त गावांमध्ये पोचले. तेथे त्यांनी थेट पूरग्रस्त नागरिकांना या सर्व वस्तूंचे वाटप केले. यावेळी सुमारे 200 कुटुंबांना ही मदत करण्यात आली.

या वेळी कुंदा भिसे यांनी पिंपळे सौदागरकरांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून पुढील काळातही अशाच प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.