Pimpri News : निरपेक्षपणे काम करणाऱ्यांना काँग्रेसमध्ये न्याय मिळतो – सचिन साठे

एमपीसी न्यूज – न्याय व्यवस्थेवरील विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी अन्यायग्रस्त पिडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे, असे आवाहन करत काँग्रेस पक्षात निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच न्याय मिळतो, असे मत काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केले.

रविवारी (दि. 12) आकुर्डी येथे शहर काँग्रेसच्या लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे बोलत होते. या वेळी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष गिरीजा कुदळे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, ॲड. अनिरुद्ध कांबळे, मयूर जयस्वाल, मकरध्वज यादव, प्रतिभा कांबळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, विशाल कसबे; चंद्रशेखर जाधव, संदेश बोर्डे आदी उपस्थित होते.

या वेळी शहर काँग्रेसच्या लीगल सेलच्या उपाध्यक्ष पदी ॲड. विभा नरेंद्र सिंह, ॲड. रामचंद्र बंकट कळसाइत, सरचिटणीस पदी ॲड. संकल्पा रघुनाथ वाघमारे, चिटणीस पदी ॲड. विकास नागरे, ॲड. शुभांगी विनोद थोरात आणि सदस्य म्हणून ॲड. अनुजा सुधाकर कांबळे यांची नियक्ती करण्यात आली.

साठे म्हणाले, भारत हे जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र आहे. घटनातज्ज्ञ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचे पालन आपण सर्व करतो. ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांना देवदूत प्रमाणे न्याय मिळवून देण्याचे काम वकील बंधू, भगिनी करीत असतात.

जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास आणखी दृढ होण्यासाठी वकिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. अशा वकिलांचा सन्मान करीत त्यांना  लीगल सेलचे व्यासपीठ काँग्रेसने दिले आहे. त्याचा त्यांना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपयोग होईल.

महिलांवरील अत्याचारांच्या घटना, कौटुंबिक हिंसाचार, गुंडगिरी, आर्थिक तसेच सायबर क्राईमला बळी ठरलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम वकील बंधू- भगिनींनी करावे, असे साठे म्हणाले.

प्रास्ताविक काँगेस लीगल सेलचे शहर अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन गौरव चौधरी यांनी केले. मकरद्वज यादव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.