Pimpri News : इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसची केंद्र सरकारविरोधात निदर्शने

एमपीसी न्यूज – पेट्रोल, डिझेल दरामध्ये होत असलेल्या दैनंदिन व सातत्याच्या दरवाढी विरोधात पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज (शनिवारी) पिंपरी चौकातील एच.पी.पेट्रोल पंपाजवळ केंद्रातील भाजपा सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.

”बीत गये अब कितने दिन, कब आयेंगे अच्छे दिन” ! ”मोदी सरकार मुर्दाबाद ! भाजपा सरकार मुर्दाबाद” ! ”पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्या”, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “पेट्रोल व डिझेल च्या दरवाढीने देशातील जनता हवालदिल झाली आहे. सामान्य माणसाचे कौंटुबिक बजेटच ढासलळे आहे. केंद्रातील मोदी सरकारला या बाबत काहीच वाटत नाही. यावरून त्यांचा सत्तेचा मस्तवालपणा व जनते बद्दलची अनास्था स्पष्ट दिसून येते. सत्तेत येताना महागाई कमी करण्याचे वचन दिलेले मोदी सरकार यावर आज काहीच बोलत नाही. हेच का तुमचे अच्छे दिन ? असा प्रश्न व त्याचे उत्तर ही जनतेला आता मिळाले आहे. हमोदी सरकार फसवे, खोटे, भ्रष्टाचारी, असंवेदनशील व विश्वासघाती ठरले आहे”.

इंधन दरवाढीचा परिणाम बाजारपेठेतील ईतर सर्व वस्तूंच्या दरांवर होतो. इंधन दरवाढ ही महागाईची जननी ठरते. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमती कमी होऊनही सरकार दरवाढ मागे घेत नाही. यावरून सरकारची नफेखोरी दिसते. कोरोनाच्या कठिण काळातही उत्पनाचे स्त्रोत कमी झाले असतानाही दरवाढीमधून होरपळलेल्या नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आज हे आंदोलन करत आहोत” असे बनसोडे म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, कौस्तुभ नवले, सेवादलाचे अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस शंकर ढोरे, अलोक लाड, विशाल सरवदे, मिलिंद बनसोडे, योगेश नायडू, संतोष देवकर,अनिल सोनकांबळे, अर्णव कामठे, भूषण भंडारी, प्रविण जाधव, पांडूरंग वीर, बाबू खान आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.