Pimpri : पोलिसांच्या बडी कॉप उपक्रमात महाविद्यालयीन मुलींच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये पोलिसांचा क्रमांक

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या बडी कॉप उपक्रमा अंर्तगत शाळा महाविद्यालयीन मुलींचा व्हाट्स अप ग्रुप तयार करून त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा नंबर समाविष्ट केला जात आहे. यामुळे यापुढे कोणत्याही मुलीला छेडछाडीच्या त्रास होत आसल्यास या ग्रुपवर माहिती दिल्यास तात्काळ पोलिसांची मदत मिळणार आहे.

राज्यात महिला व मुलींवर होणारे वाढते अत्याचार, छेडछाडीच्या घटना, शाळा महाविद्यालयात होणारे रॅगिंगचे प्रकार, व्यसन आदी प्रकारांवर आळा बसविण्यासाठी पोलीस विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. बडी कॉप या उपक्रमाद्वारे शाळा महाविद्यालयीन मुलींचा व्हाट्स अप्स ग्रुप तयार करून त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा नंबर समाविष्ट केला जाणार आहे.

निगडी येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलमध्ये आयोजित मुलीं आणि महिला संरक्षणासाठी पोलीस विभागाच्या बडी कॉप या उपक्रमांची माहिती महाविद्यालयीन मुलींना देण्यात आली. या ग्रुपवर समाजातील महिलांसह मुलींवर होणाऱ्या छेडछाडीची माहिती निर्भीडपणे पोलिसांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे, यामुळे अशा घटना कमी होतील असे मत निगडी पोलीस चौकीचे उपनिरीक्षक केरबा माकणे यांनी व्यक्त केले.

या वेळी संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.