Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे 8 डिसेंबरला ‘रनथॉन ऑफ होप हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ निगडी- पुणेच्या वतीने निगडी येथे 8 डिसेंबर रोजी ‘रनथॉन ऑफ़ होप हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती क्लबचे अध्यक्ष विजय काळभोर, डॉ. प्रवीण घाणेगावकर यांनी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

निगडी प्राधिकरणातील सिटी प्राईड शाळेसमोरील मैदानावरून 8 डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पुरुष व
महिलांसाठी 21 किमी, 10 किमी, 5 किमी अशा चार अंतरासाठी हे स्पर्धा होणार आहे. या व्यतिरिक्त कॉर्पोरेट कंपन्यांच्या कर्मचारीवर्गासाठी विशेष 5 किमी आणि 2 किमी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना टी शर्ट, पदक, प्रमाणपत्र व अल्पोपाहार देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत प्रत्येक गटातून 3 स्पर्धक घोषित केले जातील. 21 किमी गटासाठीपहिले बक्षीस 25 हजार, दुसरे बक्षीस 15 हजार, तर तिसरे बक्षीस 10 हजार आहे. एकूण 5 लाख रुपयांची बक्षीदे देण्यात येणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी www.runthon.org.in किंवा   9890505194 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.या स्पर्धेतून उपलब्ध होणाऱ्या निधीतून रोटरी क्लब निगडीच्या माध्यमातून गरिबांवर मोफत शस्त्रक्रिया, हॅपी व्हिलेज, शौचालय, शैक्षणिक साहित्य वाटप, जलसंधारण योजना, जलसाठा अशा योजना राबविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष विजय काळभोर यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.