Pimpri: निगडी रुपीनगरचा भाग मध्यरात्रीपासून होणार ‘सील’!

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने निगडी-रुपीनगरचा काही भाग आज (गुरुवारी) मध्यरात्री 11 वाजल्यापासून सील केला जाणार आहे. पुढील आदेशापर्यंत हा भाग सील असणार आहे. परिसरात प्रवेश, परिसरातून घरातून बाहेर पडण्यास नागरिकांना पुढील आदेशापर्यंत बंदी असणार आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

  • हा भाग केला सील!
    रुपीनगर निगडी येथील हनुमान मंदिर-समर्थ सुपर मार्केट-भाग्यलक्ष्मी बस पार्किंग-ओम साई दुध डेअरी-भूषण गॅस एजन्सी-लकी एंटरप्रायजेस-ज्ञानदिप प्रायमरी स्कूल-माऊली मेडिकल-आयसीआयसीआ बँक एटीएम-हनुमानमंदिराचा परिसर आज मध्यरात्री 11 वाजल्यापासून सील केला आहे. याबाबतची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

यामुळे केला भाग सील
निगडी रुपीनगर परिसरातील एका 26 वर्षाच्या तरुणाचे कोरोनाचे रिपोर्ट आज (गुरुवारी)सकाळी पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याहाय रिस्क कॉन्टॅक्टमधील काही जणांना महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिसरात रुग्ण सापडल्याने हा भाग सील केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.