Pimpri : राष्ट्रवादीच्या पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी निलेश पांढारकर यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी निलेश पांढारकर यांची फेरनिवड करण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी त्यांची निवड केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करून पक्ष संघटनेचा विस्तार कराल असा विश्वास या नियुक्ती पत्रामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.