Pimpri: महापालिकेच्या ‘फेस्टिवल ऑफ द फ्युचर’वर नऊ लाखांची उधळपट्टी!

एमपीसी न्यूज – महापालिकेतर्फे फेब्रुवारी अखेर राबविण्यात येणा-या ‘पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय ‘फेस्टिवल ऑफ द फ्युचर’ या उपक्रमाच्या बक्षीसांसह एकूण तब्बल नऊ लाख रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. करदात्यांच्या नऊ लाखांची उधळपट्टी केली जाणार असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटीअंतर्गत शहर परिवर्तन कार्यालयामार्फत युवा उद्योजकांना प्रोत्साहन देणे, नवीन उद्योजक घडविण्याचे कारण पुढे करत ‘पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय ‘फेस्टिवल ऑफ द फ्युचर’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.

28 आणि 29 फेब्रुवारी 2020 रोजी होणा-या उपक्रमाअंतर्गत हॅकेथॉन, पीचफेस्ट, नव उद्योजकांनी निर्माण केलेल्या संकल्पनांचे प्रदर्शन, नामांकित व्यक्तींचे मार्गदर्शन होणार असल्याचा महापालिकेचा दावा आहे.

या उपक्रमाअंतर्गत हॅकेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना नऊ लाखांची बक्षीसे दिली जाणार आहेत. पहिल्या क्रमांकासाठी एक लाख, द्वितीय 75 हजार आणि तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या एकूण नऊ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.